(इक्बाल जमादार/खेड )
खेड मधील एका डॉक्टरच्या दवाखान्याला मंगळवारी पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.
शहराजवळील भडगाव – खोंडे येथे रस्त्यालगत डॉ.उमेश कांबळे यांच्या साई क्लिनिकला मंगळवारी २६ एप्रिल रोजी 6.30 सुमारास आग लागली. या आगीत दवाखाना जळून खाक झाला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पहाटेच्या सुमारास आग लागल्याने वर्दळ कमी प्रमाणत होती.