(रत्नागिरी)
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी ५ मार्च रोजी खेडमध्ये सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रामदास कदम यांच्यावर टीकेचे आसूड ओढले होते. खेडमधील गोळीबार मैदानातही विराट जाहीर सभा झाली होती. आता त्याच मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सभा घेणार आहेत. शिंदे गटाकडून यासभेची जोरदार तयारी सुरू असून ठाकरेंच्या टीकेला ते कसे उत्तर देतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. १९ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होत असून खेडचे आमदार व शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी या सभेची माहिती टिझर पोस्ट करून दिली आहे.
शिवसेना निष्ठावंतांचा एल्गार!!
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड येथे शिवसैनिकांची भव्यदिव्य जाहीर सभा..
१९ मार्च २०२३ वेळ सायंकाळी ५ वाजता, गोळीबार मैदान, खेड.#Shivsena pic.twitter.com/y7BCnD577L— Yogesh Ramdas Kadam (@iYogeshRKadam) March 17, 2023
उद्धव ठाकरेंच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी शिंदे गटाने तेच मैदान निवडले आहे. शिंदे यांच्या जाहीर सभेसाठी गोळीबार मैदानात स्टेज उभारणी जवळपास पूर्णत्वाला गेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या सभेमुळे शिंदे गटात कमालीचा उत्साह असून खेडमधील गोळीबार मैदान हाउसफुल करण्यासाठी नियोजनासाठी कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात आली आहे.