(दापोली)
खासदार सुनिल तटकरे यांच्या खासदार निधीतून दापोली तालुक्यातील महामाई मंदिर, उन्हवरे येथे सभामंडपाचा उदघाटन समारंभ सोहळा दिनांक ७ मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद आमदार श्री.अनिकेत तटकरे व मा.आमदार श्री.संजयराव कदम यांच्या हस्ते पार पडला.
ग्रामदैवत असलेल्या महामाई मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यास यावेळी मुंबईकर व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. हे मंदिर सुसज्ज व्हावे यासाठी ग्रामस्थ सतत पाठपुरावा करीत होते. आज त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याने त्यांच्या चेहर्यावर एक विलक्षण आनंद दिसत होता. अशा कार्यक्रमास उपस्थित राहता आल्याबद्दल समाधान वाटले या मंदिरालगत संरक्षक भिंतीसाठी लागणारा निधी स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद आमदार श्री.अनिकेत तटकरे यांच्या निधीतून उपलब्ध करून दिला जाईल असे सांगण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी दापोली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते श्री.मुजीब रूमाणे, दापोली तालुकाध्यक्ष श्री.जयवंत जालगावकर, महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस श्री.संदीप राजपुरे, श्री.जुबेर, उन्हवरे सरपंच सौ.प्राची संदेश पवार, उपसरपंच श्री.महेश जावळे, उन्हवरे ग्रामपंचायत माजी सरपंच श्री.अयाज खोत, ग्रामीण अध्यक्ष श्री.शंशिकांत पानकर, मुंबई अध्यक्ष श्री.दत्ताराम रामाणे, ग्रामीण सचिव श्री.प्रविण कानसरे, मुंबई सचिव श्री.नितिन तळवटकर, खजिनदार श्री.पर्शुराम पवार, मुंबई खजिनदार श्री.पांडुरंग लोंढे, युवक जिल्हा उपाध्यक्ष श्री.युवराज जाधव, श्री.संदेश पवार, श्री.राजाराम पवार तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.