तोक्ते चक्रीवादळामुळे मुसळधार पावसासह प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील 3 हजार 665 गावांमधील यंत्रणेची प्रचंड हानी झाली आहे. यामध्ये 18 लाख 43 हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा विस्कळीत झाला असून त्यापैकी 52 टक्के ग्राहकांचा वीज पुरवठा काल दुपारपर्यंत पूर्ववत करण्यात आला आहे. चक्रीवादळ बाधित उर्वरित ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा असे निर्देश देण्यात आले असून महावितरणचे 13 हजार 172 कर्मचारी दुरुस्तीची कामे अविश्रांत करीत आहेत अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.
तोक्ते चक्रीवादळामुळे महावितरणच्या 138 उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडला होता. त्यापैकी 78 उपकेंद्र सुरू करण्यात आले आहेत. तर 706 पैकी 439 वीज वाहिन्यांचा पूर वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान मोठे व कोविड रुग्णालय, ऑक्सीजन निर्मिती व रिफिलिंग उद्योग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्र, पाणीपुरवठा, मोबाईल टॉवर्स ,घरगुती ग्राहक आदींचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्राधान्याने दुरुस्ती हाती घेतली आहे. यामध्ये चार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास, 210 पैकी 173 कोविड सेंटर व लसीकरण केंद्राचा वीजपुरवठा अवघ्या अर्धा ते दोन तासांमध्ये सुरू पूर्ववत सुरू करण्यात आला असून उर्वरित ठिकाणी वीजपुरवठा सुरू करण्याचे काम सुरू आहे .
काल दुपारपर्यंत हे चक्रीवादळ बाधित सातही जिल्ह्यातील 9 लाख 35 हजार घरगुती वाणिज्यिक व औद्योगिक ,1284 शहरी व ग्रामीण पाणी पुरवठा योजना 765 मोबाईल टॉवरचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. या जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा येथे 48 तासांमध्ये सुरू करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र सिंधुदुर्ग व रत्नागिरी मध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर अति तीव्र स्वरूप धारण केलेल्या चक्रीवादळामुळे वीज यंत्रणेची सर्वाधिक आणि झाली आहे.
महावितरण चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री .विजय सिंघल यांनी माहिती दिली की, चक्रीवादळामुळे वीजपुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. याकरता मुंबई मुख्यालय स्तरावर स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले होते. यामध्ये तीन मुख्य अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली असून चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या भागातील अधिकाऱ्यांसोबत वीज पुरवठ्याबाबत ते समन्वय साधत आहेत
तसेच मुख्यालयातील दोन अभियंत्यांना सिंधुदुर्ग येथील वीज यंत्रणेच्या कामांची निकड लक्षात घेऊन समन्वय साधण्यासाठी नियुक्त केले आहे व ते कालच रवाना झाले आहेत. त्याचप्रमाणे बारामती कोल्हापूर येथील तांत्रिक कर्मचाऱ्यांना सुद्धा येथील कामासाठी पाठविण्यात आले आहे .याशिवाय चक्रीवादळ बाधित भागात महावितरणचे नियमित बाह्य स्तोत्र कर्मचारी आणि एजन्सिज युद्धपातळीवर काम करत आहेत.
चक्रीवादळामुळे होणारे वीज यंत्रणेचे नुकसान नुकसान लक्षात घेऊनच 622 वितरण रोहित्र , 347 किलोमीटर वीज वाहिन्या ,3439 किलोमीटर वीज तारा, 20 हजार 498 वीज खांब,12 मोठी वाहने, 46 जेसीबी व क्रेन सुमारे तीनशे दुरुस्ती वाहने संबंधित जिल्ह्यात उपलब्ध असून मागणीप्रमाणे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे .
या चक्रीवादळामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. ऊर्जा मंत्री ना. डॉ. नितीन राऊत हे सातत्याने चक्रीवादळ बाधित भागातील वीजपुरवठा बाबतची माहिती घेत असून सतत मार्गदर्शन करत आहेत. गेल्या तीन दिवसापासून आपण प्रादेशिक संचालक व मुख्य अभियंता यांच्या संपर्कात राहून दर तासाला आढावा घेत असून आवश्यक त्या सूचना निर्गमित करत असल्याची माहितीदेखील सिंगल यांनी दिली.