कोविड १९ चा रत्नागिरी जिल्हयात दुस-यांदा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आल्याने, सदर साथीस प्रतिबंध व्हावा यासाठी प्रशासनाकडून दि.१५/०४/२०२१ रोजी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. या अनुषंगाने सर्व शासकिय यंत्रणा सक्रिय झाल्या होत्या. परंतु कोविड १९ चा प्रादुर्भाव सतत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी दि.२८/०४/२०२१ रोजी सात कलमी ग्रामदत्तक योजना जाहीर केली.
या योजनेअंतर्गत पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरी शहरालगत असलेली राजीवडा व मिरकरवाडा ही गावे दत्तक घेतली आणि अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी कसोप, ता. रत्नागिरी ही गावे दत्तक घेतली. याप्रमाणेच रत्नागिरी जिल्हयातील रत्नागिरी, लांजा, चिपळूण व खेड येथील उपविभागिय पोलीस अधिकारी यांनी तसेच जिल्हयातील १८ पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांनी वेगवेगळी गावे दत्तक घेतली
या योजनेचे असे स्वरूप आहे की, रत्नागिरी जिल्हयातील वर नमुद प्रमाणे दत्तक घेतलेल्या गावांमध्ये तेथील रहिवाशांची ऑक्सीजन लेव्हल तपासणे, त्यांचे शारीरीक तापमान व पल्स तपासणे या तपासण्यांमध्ये रहिवाशांच्या तब्येतीमध्ये विसंगती दिसल्यास आवश्यकतेनुसार त्यांना वैद्यकिय उपचारासाठी मदत करणे, योग्यत्या रुग्णांना होमक्वॉरंटाईन करणे, रहिवाशांचे प्रबोधन करणे व रहिवाशांना कोविड पासुन बचाव करण्याच्या उपाययोजनांची माहिती देणे, तसेच संबंधीत गावांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्यासाठी मदत करणे
या अनुषंगाने जिल्हयातील अनेक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार मोहिम हाती घेतली. या तपासणीमध्ये आज पर्यंत रत्नागिरी जिल्हयामध्ये एकूण १५,४५२ नागरीकांची तपासणी करण्यात आली असुन एकूण ३३ रहिवाशांमध्ये कोविड १९ चा संसर्ग झाल्याचे दिसून आले. त्यांना योग्य त्या औषधोपचारासाठी मदत करण्यात आली आहे. या कार्यवाहीत ग्राम कृतीदल, वाडी कृतीदल, आशा सेविका, तसेच स्थानिक रहिवाशी यांची मदत होते.