(चिपळूण)
शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते दहिवलीमधील विद्यार्थिनींकडून, निर्व्हाळ या गावामध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त व ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत सहभागी ग्रामीण मूल्यांकन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून त्यांनी गावातील रस्ते, वाड्या, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, मंदिरे, नदी तसेच गावातील अन्य सोई-सुविधा, ग्रामस्थांच्या विविध अडचणी त्यावरील उपाययोजना यांचा सखोल अभ्यास केला. हा उपक्रम त्यांच्या पुढील कार्यक्रमासाठी अत्यंत उपयुक्त होता.
या कार्यक्रमा अंतर्गत त्यांनी अनेक नैसर्गिक गोष्टी वापरून गावाचा हुबेहूब नकाशा काढला होता व त्यात गावातील सर्व महत्त्वाची ठिकाणे देखील दर्शवली होती. या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच श्री. मधुकर सावंत तसेच अन्य ग्रामस्थ देखील उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सर्व कृषिकन्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील, प्रकल्प समन्वयक प्रा.निशिकांत पाकळे व प्रा .पी .बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन कृषिकन्या हर्षदा वाघमोडे, जान्हवी मेघा, ऐश्वर्या इवनाते, रामेश्वरी रिंगे आणि श्रद्धा उतेकर यांनी केले होते.