(लांजा)
लांजा तालुक्यातील भांबेड वरची गांगणवाडी येथील ज्येष्ठ नागरिक भालचंद्र गांगण हे भांबेड वरची गांगणवाडी या ठिकाणी बस स्टॉप मंजूर व्हावा यासाठी लांजा आगार प्रमुख यांच्याशी गेले आठ नऊ महिने पत्रव्यवहार करत होते. अनेक वेळा त्यांनी संबंधित विभागाशी पाठपुरावा करूनही एसटी बस स्टॉप थांबा काही मंजूर होत नव्हता. हेच पत्र किरण सामंत यांना त्यांच्या कार्यालयीन पत्त्यावर काल दि.08/12/23 रोजी सकाळी पोस्ट द्वारे प्राप्त झाले. त्यांनी मिळाले पत्राचे मजकूर वाचला आणि तात्काळ सूत्र हलवली.
गेले सात ते आठ महिने ज्या एसटी स्टॉपसाठी जेष्ठ नागरिक धावपळ करत होते, तसेच पाठपुरावा करत होते, त्यांच्या पत्राला संबंधित केराची टोपली दाखवली जात होती. मात्र किरण सामंत यांनी ती गरज ओळखून आणि त्यांच्या भावनांचा आदर राखत एसटी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. तात्काळ त्यांनी भांबेड प्रभानवल्ली या ठिकाणी बस स्टॉप थांबाच्या कामाला सुरुवात केली. या ठिकाणी उद्यापासून एस. टी बस थांबण्यास सुरवात होणार आहे.
आलेले पत्र त्याचा पाठपुरावा करून ते काम पूर्ण करून थेट भैय्यानी पत्र पाठवणाऱ्यांना फोन केला. हॅलो… मी किरण सामंत बोलतो… हे वाक्य ऐकून समोरील ज्येष्ठ नागरिक हे सुन्न झाले. तुमच्या आठ महिन्याची मागणी मी तात्काळ पूर्ण करायला लावली असून आपण 26 जानेवारीला कोणताही पद्धतीचे उपोषण करू नये अशी विनवणी यावेळेस किरण सामंत यांनी केली. सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आदर करत संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. जर त्या ठिकाणी बस थांबली नाही तर मी स्वतः येऊन थांबेन तुम्ही काळजी करू नका… तुम्ही सर्व ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्या… तुम्हाला कोणाला अडचण आली तर तुमचा किरण आहे, कधीही मला फोन करा… असे सांगितले. यावेळी ते ज्येष्ठ नागरिक म्हणाले, आम्ही मागणीचे पत्र तुम्हाला पाठवताच तो विषय मार्गी लावून तात्काळ फोन करणारा नेता आपण पाहिलाच असल्याचे सांगितले. लांजा तालुक्यातील भांबेड येथील ग्रामस्थांनी किरण सामंत यांचे मनापासून आभार मानत धन्यवाद दिले आहेत.