(रत्नागिरी)
कामगारांच्या न्याय हक्कासाठी झटणारा, समाजहित जपणारा उमद्या व श्रीमंत मनाचा, मृत्यूलाही माघारी धाडत शेवटच्या क्षणापर्यंत समाज कल्याण हे तत्व उराशी बाळगून ज्याने कामगार चळवळ उभी केली, त्या मिलिंद शिवराम बेटकर यांचेवर घिरट्या घालणाऱ्या काळाने अखेर झडप घातली. मध्यरात्री त्याची झुंज संपली. मिलिंदच्या कोकण रेल्वेच्या हजारो कामगारांचा एक बुलंद आवाज हरपला आहे. तत्वनिष्ठ, समाजसेवक आणि सहकारी मिलिंदला भावपूर्ण श्रद्धांजली !
हृदयविकाराच्या आजाराशी मिलिंद काही वर्षे झुंजत होता. कोकण रेल्वेत रुजू झाल्यानंतर नोकरी सांभाळून त्यांनी समाजहित जोपासले होते. कामगार चळवळीत सक्रीय सहभाग घेऊन कामगारांच्या अडी अडचणी त्यांनी सोडवल्या. एस/टी/एसटी संघटना विभागीय सचिव माध्यमातून अनेक कामगारांचे प्रश्न मार्गी लावले. मिलिंदच्या अशा अकाली मृत्यूने संघटनेत पोकळी निर्माण झाली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांना आदर्श मानून मिलिंद आपले समाजकार्य करून नोकरी करत होता.
शिका, संघटित व्हा हा मंत्र जपला हा मंत्र मिलिंद ने जोपासला होता. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता ऑल इंडिया एस/सी / एस.टी. अससोसिएशन कोंकण रेल्वे रत्नागिरी चे क्षेत्रीय सचिव मिलिंद शिवराम बेटकर ह्यांचे अचानक निघून जाणे म्हणजे सर्वांच्या जीवाला चटका लावून जाण्यासारखे आहे. नेहमी सदैव सहकार्याची व आपलेपणाची भावना ठेवणारा मिलिंद सर्वाना प्रिय होता. मिलिंद एक उकृष्ट कलाकारही होता. अभिनयाची त्याला खूप आवड होती. त्याचे मूळ गाव लांजा तालुक्यातील मठ असुरडे आहे. दिलदार श्रीमंत मनाच्या सहकारी मित्राला विनम्र अभिवादन !