( रत्नागिरी / प्रतिनिधी )
मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाच्या कामासाठी आणलेल्या एका पोकलेनच्या ब्रेकरची चोरी केल्याची घटना 19 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद विनायक विलास कदम (41, मंगळवारपेठ, कराड, सातारा) यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई – गोवा महामार्गावरील कापडगाव येथील मोकळया जागेत पोकलेन उभा करुन ठेवण्यात आला होता. या पोकलेनचा 2 टन वजनाचा 80 हजार रुपये किंमतीचा लोखंडी ब्रेकर अज्ञाताने चोरुन नेला. याबाबतची फिर्याद विनायक कदम यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल केल आहे.