आपण जर एखाद्या सुप्रसिद्ध कॉर्पोरेट कंपनी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेत काम करत असल्यास बँक किंवा कर्ज संस्थेला तुमच्या उत्पन्नाची इतरांपेक्षा अधिक खात्री मिळते. तुमच्या उत्पन्नावर तुम्ही कर्जाची वेळेत परतफेड करू शकता अशी बँकेची खात्री झाल्यास अशा अर्जदारांना EMI भरण्याची क्षमता, नोकरीची स्थिरता यावर तुमच्या कर्जाला मंजूरी मिळू शकते. पण जर तुमचा सिबील खराब असेल तर कोणतीही बँक तुम्हाला कर्ज देत नाही. ज्यांचा सिबील चांगला त्यांनाच कर्ज मिळते. त्याचप्रमाणे कमी CIBIL मुळे तुमच्या कर्जाचा अर्ज मंजूर केला जाणार नाही ही धारणा आता सोडून द्या. कारण आता कमी सिबील असतानाही तुम्हाला कर्ज मिळू शकते. ज्या लोकांचा CIBIL स्कोअर कमी आहे किंवा त्यांनी नवीन क्रेडिट घेतले आहे त्यांच्यासाठी काही मार्ग आहेत. ज्यामुळे तुम्हाला हमखास कर्ज मिळू शकते.
डिजिटल एनबीएफसीचा पर्याय
NFBC (NBFC) म्हणजेच Non Banking Financial Company. या कंपन्या अगदी बँकेप्रमाणेच कर्ज देतात. पण, त्यांना कायदेशीर बँक म्हणून मान्यता नाही. या खाजगी वित्तीय कंपन्या असून कर्जाचा व्यवहार करतात. अनेक एनबीएफसी आणि नवीन युग डिजिटल कर्ज संस्था कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या अर्जदारांना वैयक्तिक कर्ज देतात. पण, अशा NBFC द्वारे देऊ केलेत्या कर्जाचा व्याजदर बँकांपेक्षा जास्त असतो.
सह अर्जदारासह अर्ज करा
तुमचा CIBIL स्कोअर कमी असल्यास तुम्ही कुटुंबातील कमावत्या सदस्याला सह-अर्जदार बनवून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. यामुळे तुम्हाला कर्ज देणारी बँकेची जोखीम कमी होते. कारण, या प्रकरणात सह अर्जदारही तुमच्याप्रमाणे कर्जाची परतफेड करण्यासाठी तितकेच जबाबदार असतात. पण, यात तुमच्या सहकारी अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर चांगला असावा लागतो. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असला तरी सह अर्जदार सोबत असल्याने कर्ज मिळण्यात अडचण येणार नाही.
वैयक्तिक कर्जाची रक्कम कमी निवडा
CIBIL स्कोअर कमी असल्यामुळे बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. अशावेळी आपण कमी कर्जाच्या रकमेसाठी अर्ज करावा. ज्यामुळे तुम्हाला कर्ज परतफेड करणे सोपे होईल तसेच बँकेलाही कर्ज देताना जोखीम कमी वाटेल. कमी क्रेडिट स्कोअर असलेले अर्जदार कर्ज मिळवण्यासाठी जमीन, मुदत ठेव, सोने तारण ठेवून कर्ज घेऊ शकतात.
सिबिल स्कोर म्हणजे काय आणि तो कसा काम करतो?
तुमचा सिबिल स्कोर तीन अंकांचा एक क्रमांक असतो. जो ३००-९०० दरम्यान असतो. याच्या आधारावर तुमच्या क्रेडिटची पात्रतेचे आकलन केले जाते. तुमची क्रेडिट हिस्ट्री आणि तुमचा सिबिल रिपोर्ट पाहून क्रेडिट स्कोर मिळवला जातो. ज्याला ट्रांसयुनियन सिबिल द्वारे रेकॉर्डच्या रुपात ठेवले जाते. तुम्हाला एखादे कर्ज मिळण्यापूर्वी जसे आपण पाहिले सिबिल स्कोर तपासून पाहिला जातो. पण तुमचा क्रेडिट स्कोर ९०० च्या आसपास असेल तर तुम्हाला कर्ज मिळणे अधिक सोप्पे होते. तर ३०० च्या आसपास सिबिल स्कोर असणे उत्तम मानले जात नाही. तर पर्सनल लोनसाठी तुमचा सिबिल स्कोर कमीत कमी ७५० च्या आसपास असावा. त्याचसोबत गृहकर्जासाठी प्रत्येक कर्ज देणाऱ्या बँकेची अट ही सिबिल स्कोरसाठी वेगवेगळी असते. एखाद्याची मर्यादा ७०० तर दुसऱ्याची ६५० असू शकतो. मात्र ७५० किंवा त्याहून अधिक असेल तर उत्तम मानले जाते.
सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी काय कराल ?
तुमचे सीबील खराब आहे अशावेळी होमलोन घ्यायचे आहे. 1 वर्षानंतर घर मिळणार असेल तर सीबील सुधारण्यासाठी गृहकर्ज घेण्यासाठी एक उपाय आहे. ज्या बँकेत तुमचे खाते आहे तिथे 50 हजारांची एक फिक्स डिपॉझिट करा. त्या फिक्स डिपॉझिटसाठी एक क्रेडिट कार्ड apply करा. बँक तुम्हाला 40 हजारांचे लिमिट असलेले क्रेडिट कार्ड देईल.
हे क्रेडिट कार्ड दर महिन्याला 20 ते 50 टक्के वापरा. त्याचे बिल जनरेट झाले की 3 दिवसांच्या आत पेमेंट करा. वेळेत पेमेंट केल्याचे 3 आणि कार्ड वापरायचे 3 असे 6 पॉईंट्स तुमच्या सिबिल स्कॉरला जमा होतील. त्यामुळे पुढील 6 ते 12 महिन्यात सिबिल स्कोर सुधारेल. शिवाय फिक्स डिपॉझिटचे बँक तुम्हाला 6 टक्के व्याज देईल ते वेगळचे.
CIBIL Score साठी अशी घ्या काळजी
-जर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर उत्तम करायचा असेल तर नेहमीच लक्षात ठेवा की, जे काही कर्ज तुम्ही घेतले आहे त्याचे पेमेंट वेळेवर करा. ईएमआय भरण्यासाठी उशिर करु नका.
-तुम्हाला तुमच्या क्रेडिट रिपोर्टचा तपास करायला हवा. काही वेळेस असे होते की, तुम्ही तुमच्याकडून कर्ज फडले आणि ते बंद ही झाले. मात्र काही प्रशासनिक कारणांस्तव कर्ज अॅक्टिव्ह असल्याचे दिसते. याचा प्रभाव तुमच्या क्रेडिट स्कोरवर पडतो. त्यामुळे क्रेडिट स्कोरचा रिपोर्ट जरुर तपासून पहा.
-सिबिल स्कोर सुधारावा असे वाटत असेल तर प्रथम तुम्ही तुमच्या क्रेडिटचे बिल वेळोवेळी भरावे. कोणत्याही कर्जाची रक्कम शिल्लक ठेवू नका. जेणेकरुन तुमचा सिबिल स्कोर सुधारेल.
-सिबिल स्कोर ठीक करण्यासाठी लोन गारंटर राहू नका. या व्यतिरिक्त जॉइंट अकाउंट सुद्धा उघडू नका. अशातच दुसरी पार्टीने डिफॉल्ट केल्यास त्याचा प्रभाव तुमच्या सिबिल स्कोरवर पडू शकतो.
-तसेच एकाच वेळी एकापेक्षा अधिक कर्ज घेण्यापासून दूर रहा. जरी घतले असतील तरीही ते वेळोवेळी भरा. मात्र ते भरले नाहीत तर तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो.
-तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर सुधारायचा असेल तर कर्ज दीर्घ काळासाठी घ्या. असे केल्याने ईएमआयची रक्कम कमी होते. त्यामुळे तुम्हाला सुद्धा ते भरण्यास अगदी सोप्पे जाते. जेव्हा तुम्ही वेळोवेळी आपले पेमेंट करता तेव्हा तुमचा सिबिल स्कोर वाढेल.