चिपळूण/प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याहस्ते सह्याद्रि शिक्षण संस्थेचे संस्थापक, माजी खासदार स्व. गोविंदरावजी निकम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण काल रविवार 24 एप्रिल रोजी करण्यात आले.
सह्याद्रि शिक्षण संस्थेचे शरदचंद्रजी पवार अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय आणि उद्यानविद्या महाविद्यालय नविन इमारत उद्घाटन समारंभ सोहळा दि.२४ एप्रिल २०२२ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते खरवते-दहिवली, चिपळूण येथे पार पडला.
यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.उदयजी सामंत, रत्नागिरी-रायगडचे खासदार मा.सुनिलजी तटकरे, सहयाद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.शेखरजी निकम, आमदार मा.भास्करराव जाधव, दापोली विधानसभा मा.आमदार श्री.संजयराव कदम, जिल्हाध्यक्ष श्री.बाबाजीराव जाधव, महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस श्री.संदीप राजपुरे, जिल्हा बँक अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठाचे कुलगुरु डॉ.संजय सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते.