(क्रीडा)
नुकतीच दक्षिण आफ्रिकेतील नव्या टी२० लीगची घोषणा झाली आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड ही नवी लीग आयोजित करतेय. विशेष म्हणजे या लीगसाठी दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्रीय संघ ऑस्ट्रेलियाचा महत्त्वाचा दौराही रद्द करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या लीगमधील सर्व सहा संघ आयपीएलमध्ये संघमालक असलेल्या उद्योगपती व कंपन्यांनी घेतल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपरजायंट्स व सनरायझर्स हैदराबाद या संघाचे नाव समोर येतेय. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ या लीगचा संचालक असेल.
भारतीय खेळाडू दिसण्याची शक्यता
याच वृत्ताच्या आधारे भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा याने एक महत्त्वपूर्ण विधान केले. त्याच्यामध्ये लवकरच भारतीय खेळाडू जगातील विविध लीगमध्ये खेळताना दिसून येतील. तो म्हणाला,
“काही भारतीय खेळाडू जगातील इतर टी २० लीगमध्ये नक्कीच खेळताना दिसतील. जे आयपीएल खेळत नाहीत ते तर यासाठी उपलब्ध असू शकतात. सुरेश रैनासारखा खेळाडू फ्रँचाईजींना आकर्षित करू शकतो. त्याच्यावर आजही कोणी मोठी बोली लावू शकते. आता दक्षिण आफ्रिकेतील नवी लीग तसेच, युएईत होणारी लीग यामध्ये भारतीयांनी गुंतवणूक केल्याने, त्या लीग भारतीयच झाल्या आहेत. अशा परिस्थितीत काही भारतीय खेळाडूंना येथे खेळण्याची परवानगी दिली जाऊ शकते.”