( रत्नागिरी / प्रतिनिधी )
भारतीय बौध्द महासभा, रत्नागिरी तालुका अंतर्गत मिरजोळे गाव शाखेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा असे तीन महिने वर्षावास कार्यक्रमाला बौध्दवाडी येथे उत्साहात प्रारंभ झाला. बुधवार (दि. १३) ग्रांमशाखेचे अध्यक्ष पंकज प्रभाकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमात मोठया संख्येने सभासद सहभागी झाले होते.
दरम्यान बौद्धचारी दीपक जाधव , माजी पोलीसपाटील यशवंत जाधव, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक भगवान जाधव व इतर उपस्थीत सभासदांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. या वर्षावास कार्यक्रमाच्या माध्यमातून दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. विद्यार्थांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन सौरभ जाधव मानले. या कार्यक्रमास सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते.
हा वर्षावासाचा कार्यक्रम पुढील तीन महिने मिरजोळे येथील बौद्धविहारात महिन्याच्या प्रत्येक रविवारी, सायंकाळी ७ : ३० वाजता घेण्यात येणार असून परिसरातील बौध्द बांधवांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.