(चिपळूण /ओंकार रेळेकर)
खडपोली येथे १७ एप्रिल रोजी विठ्ठल खरात यांचे वास्तव्य असलेले घर व दोन गोठे आगीत जळून खाक झाले. यामध्ये विठ्ठल खरात यांचे खूप मोठे नुकसान झाले होते
विठ्ठल खरात यांच्या घराला व गोठ्याला आग लागलेल्याची माहिती मिळताच आमदार शेखर निकम यांनी प्रत्यक्ष खडपोली गावात जाऊन पाहणी केली. झालेले नुकसान पाहता तात्काळ स्वतः मदतीचा हात दिला व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तानाजी चोरगे आणि संचालक मंडळ यांना घटनेबद्दल सूचित केले व आज जिल्हा मध्यवर्ती बँक, रत्नागिरी यांच्या माध्यमातून १०.००० धनादेश आर्थिक मदत स्वरूपात विठ्ठल खरात यांना देण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मीनल काणेकर, बँकेचे कर्मचारी नरेंद्र कदम, प्रतीक चव्हाण, चिपळूण धनगर समाजाचे ग्रामस्थ शांताराम येडगे, शंकर खरात, महादेव खरात, सुरेश गोरे, कृष्णकांत गोरे, लक्ष्मण येडगे, खतीफ परकार, आदी उपस्थित होते.