(खेड)
खेड तालुक्यातील दुर्गम अशा देवघर निवाचीवाडी केंद्र शाळेतील विद्यार्थी वेदांत विठ्ठल मोरे याने केंद्रस्तर, प्रभागस्तर व तालुकास्तर निवड चाचणी पार करून मंगळवार दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी रत्नागिरी येथे झालेल्या अंतिम चाळणी परीक्षेमध्ये यश मिळवून नासा व इस्रो भेटीसाठी पात्र ठरला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या यादीत निवड झाल्याने वेदांत वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 18 विद्यार्थी इस्रो भेटीसाठी व व 9 विद्यार्थी इस्रो व नासा पेटीसाठी पात्र ठरले आहेत. इस्रो व नासा भेटीसाठी पात्र ठरलेल्या 9 विद्यार्थ्यांमध्ये खेड तालुक्यातून वेदांत विठ्ठल मोरे याची निवड झाली आहे
वेदांत विठ्ठल मोरे याला देवघर निवाचीवाडी शाळेतील शिक्षिका विधी बने व मुख्याध्यापक मोहन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. आंबवली प्रभागाचे शिक्षण अधिकारी सखाराम मोहिते व केंद्रप्रमुख विनायक नलावडे यांनी शाळेला वेळोवेळी भेटी देऊन वेदांत व शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख विनायक नलावडे, आंबवली प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सखाराम मोहिते, खेडचे गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण, गटविकास अधिकारी आर. एम. दिघे यांनी विद्यार्थ्यांचे व शाळेचे अभिनंदन केले आहे