(रत्नागिरी)
अघोषित शिक्षक संघ महाराष्ट्र राज्याच्या रत्नागिरी समन्वयकांनी रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोजी रत्नागिरीमध्ये आलेल्या शिक्षण मंत्री श्री दीपक केसकर यांना अघोषित शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य समन्वयकांनी प्रत्यक्ष भेटून शिक्षकांच्या समस्या जाणून घेणारे असे निवेदन सादर केले.
सदर निवेदनामध्ये अघोषित शाळा/ प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालय/ नैसर्गिक वाढ व तुकड्या निधी सहित घोषित करून मागील 21 वर्षांची शिक्षकांची वेटबिगारी दुर करुन अघोषित शाळेतील शिक्षकांना दिनांक १ नोव्हेंबर 2020 पासून पगार देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
हे निवेदन शिक्षण शालेय मंत्री श्री. दीपक केसरकर यांना सादर करताना प्रा.तौफिक शेख (उर्दू महाविद्यालय पावस), प्रा.नितीन वळवी, प्रा. सचिन कुळये (लोकनेते शामरावजी पेजे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय)हे उपस्थित होते.